ग्रंथ प्रकाशन सोहळा

ब्रम्हसाम्राज्यातील ऐश्वर्य योग

तारीख : ५ जानेवारी २०२५
वेळ : सायंकाळी ४ वाजता
स्थळ : गांधी भवन, अंध शाळेसमोर, कोथरूड, पुणे.
सम्पर्क : दिव्योन्मेष सत्संग (९५०३१३१२०२/९४२२९८७४४७)

स्वरूप स्वानंद एकचि जाणे |
गुरुतत्वासी नित्य स्मरावे ||

रोजचा सत्संग

सोमवार आणि गुरुवार
संध्याकाळी ५.३० ते ७
प. पू. स्वामी स्वरूप स्वानंद ह्यांच्या आत्मानुभूतीतून, आधुनिक विज्ञानमय जाणीवेतून, अमोघ वाणीतून जरूर ऐका संपूर्ण ज्ञानेश्वरी, त्यातील प्रत्येक ओवीच्या निरुपणासहित यूट्यूबवर

आपला यूट्यूब चॅनेल जरूर सबस्क्राईब करा

Divyonmesh Satsang
https://www.youtube.com/@divyonmeshsatsang1658

श्रीज्ञानेश्वरी आठव्या अध्यायापर्यंत उपलब्ध असून नवव्या अध्यायाचे भाग प्रसारित होत आहेत. पुढील सर्वच अध्याय अगदी नजिकच्या काळात आपल्यापर्यंत पोहोचतीलच. त्याच सोबत प. पू. स्वामी स्वरूप स्वानंद यांची इतर विषयांवरील विशेष प्रबोधने आणि त्यांच्या काव्यरचनांचे गायन व चिंतनांचे वाचन, दृकश्राव्य पद्धतीने उपलब्ध.

दिव्योन्मेष सत्संग

सोहम साधनेचे मार्गदर्शन वर्ग

'सोहम'

स्वामी स्वरूपानंदांच्या आध्यात्मिक सोहम साधनेच्या अनुग्रहातून, स्वामी स्वरूप स्वानंद यांनी आपल्या प्रापंचिक जीवनात परमार्थ कसा करावा याचे धडे गिरवीले. त्यांच्या या अनुभूतीच्या जाणिवेतून त्यांनी ‘दिव्योन्मेष सत्संग’ सुरू केला. या सत्संगाच्या मार्फत ईश्वरभक्तांना ईश्वराची सत्य ओळख ते त्यांच्या ‘सोहम ध्यान अभ्यासवर्गातून’ करून देतात. तसेच विविध शिबिरांच्या मार्फत आणि साप्ताहिक सत्संगातून मार्गदर्शन करतात.

वैयक्तिक साधनेच्या अनुभूतीतून त्यांनी स्वयंभू ‘ग्रंथ निर्मिती’ केलेली आहे. त्याचा प्रसार दिव्योन्मेष सत्संगातर्फे होत असतो.

प.पू.स्वामी स्वरूप स्वानंद

( डॉ. सुधीर पांडे ) यांचा परिचय

व्यावहारिक जीवन- पुण्यातील इंजिनियरिंग काॅलेज मधून १९७८-७९ साली बी. ई (मेटलर्जी) ही पदवी प्राप्त. प्रथितयश कंपन्यांमधून नोकरी करून वयाच्या तिसाव्या वर्षी पुणे येथे स्वतः चा व्यवसाय करीत असतांना व्यवसाय वृद्धी व व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचा विकास साधला.

डॉ. पांडे यांनी पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठात इंजिनियरिंग काॅलेजमध्ये प्राध्यापक (विभाग प्रमुख) म्हणून आठ वर्षे शिक्षण क्षेत्रात काम केले. याच काळात 'आन्तरप्रिन्यूअरशिप' या विषयात संशोधन करून त्यांनी पीएच. डी. प्राप्त केली. लहानपणापासून संत साहित्याच्या अभ्यासाची व साधनेची आवड, त्याचबरोबर उत्तम भाषा शैली व वकृत्व प्राप्त.

डॉ.सुधीर पांडे यांच्या आध्यात्मिक व्यासंगातून तथा प. पू. स्वामी स्वरूपानंद ,पावस यांच्या अनुग्रहातून त्यांच्या आध्यात्मिक साधनेला बळकटी आली. तसेच प. पू. स्वामी विद्यानंद हे वडील असल्यामुळे लहानपणापासून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आध्यात्मिक झालर प्राप्त झाली. गुरुकृपेतून पल्लवीत झालेल्या त्यांच्या आध्यात्मिक व्यक्तिमत्त्वाला, मनन चिंतनाची आवड थेट निदिध्यासापर्यंत घेऊन गेली. अनुताप, निश्चय तथा आत्मशोधाच्या शक्तीच्या जाणिवेतून त्यांचे भावविश्व आकार घेत गेले. यातूनच साकार झालेले आत्मविचार ग्रंथ रूपात आणले गेले. व्यावहारिक जीवन आणि अध्यात्म यांची जवळीक साधली गेली.

साधनेची त्रिसूत्री

1. अनुताप

2. निश्चय

3. आत्मशोधाची शक्ती

आध्यात्मिक

मज हृदयी सद्गुरू (समर्पण)

"स्वामी, मी एक आध्यात्मिक प्रांगणातील आत्मप्रवासी, तुमचेच बोट धरून चालत आहे.स्वरूप स्वानंदाच्या जाणिवांचा तुम्हीच आधार....नव्हे कृपाछत्र ! तुमच्या असीम कृपा प्रकाशातून उलगडत जाणारी परमार्थाची वाट आध्यात्मिकतेची वेगळी दृष्टी मला देत जाते. स्वामी! तुम्हीच सांगितल्याप्रमाणे "ज्ञानेशाला नमिता झाला, श्री सद्गुरूला तोष!" - या कृपाप्राप्तीसाठी ज्ञानेश्वरी सत्संग सुरू आहे. तुमच्या जाणिवांना स्पर्श करण्याची ताकद मी नक्कीच राखत नाही. तुम्ही सद्गुरू बाबा महाराज यांना आपल्या आत्मतृप्त जाणिवेतून 'स्वरूप' व 'विश्वस्वरुपाचा' 'नवरत्न हार' समर्पित केलात.. तुमचाच अनुग्रहित शिष्य (गुरुपुत्र) या नात्याने, तुमच्याच कृपेस मी पात्र होऊन काही वेगळे आध्यात्मिक - पारमार्थिक लिखाण केले. हे लिखाण थोडे वेगळे, 'स्वयंभू जाणिवेतील' असावे, 'आत्मस्पर्शी', काळानुसार विकसित झालेले पारमार्थिक चिंतन असावे, असे मला वाटत होते. तुमच्यापर्यंत आलेली नाथ संप्रदायाची क्रांत सोsहम् या आध्यात्मिक धारणेचे स्वरूपातील व विश्वस्वरूपातील ईश्वरदर्शन, ' विज्ञानमय' जाणिवेतून अभिव्यक्त करावे, असे मनात होते. तुमच्या परमकृपेतून काहीशी वेगळी, हटके अशी आध्यात्मिक ग्रंथ निर्मिती माझ्या हातून तुम्हीच करून घेतली :

१. दिव्योन्मेष

२. गुरूपुत्र

३. परब्रह्म

४. साधनेचे विहंगम स्वरूप

५. मानव जीवन रहस्य

६. अद्वैत - उन्मेष (भाग १,२,३ - काव्य ग्रंथ)

७. आदेश गुरुदेव

८. महत् ब्रह्म शिंपल्यातील माणिक मोती

स्वामी, वरील काही ग्रंथांना साहित्य पुरस्कारही प्राप्त झाले. ही तुमचीच कृपा नव्हे का? आज मी माझा नववा ग्रंथ तुम्हाला समर्पित करीत आहे. तुमचेच तुम्हाला जणू...

'ब्रह्म साम्राज्यातील ऐश्वर्य योग'

(चतुःश्लोकी भागवतातील अतिमानसिक विश्व)

स्वामी, या ग्रंथाची प्रेरणा तुम्हीच दिलीत. अध्यात्म क्षेत्रातील पहिले वेद:- 'चतुःश्लोकी भागवत!' परब्रह्मतत्वाचे पूर्ण ज्ञान ज्यात साठविले आहे, असा हा विज्ञानमय ग्रंथ! आधुनिक मानवी मनाला नक्कीच वेगळ्या भूमिकेत क्रांत करू शकेल. स्वामी! या ग्रंथ लेखनानंतर मला पूर्णत्वाची मानसिक भूमी प्राप्त झाली, असे नक्की जाणवते. या नऊ ग्रंथांचा 'नवग्रंथ हार' मी आपणास समर्पित करीत आहे...! या ग्रंथ लेखनानंतर, तुम्ही दिलेल्या आदेशाप्रमाणे लेखणीला विराम देणार आहे. तुमच्या चैतन्यमय आत्मसान्निध्यात मला सतत स्थायी करा! एवढेच मागणे."

"ब्रह्म पाहुनी, ब्रह्म होऊनी, दिव्य जीवनी होतो |

दिव्यदेही तू, करूणाघन तू, आत्मारामी वसतो ||"

आत्मप्रवासी - गुरुपुत्र,

स्वामी स्वरूप स्वानंद, पुणे.

शिंपल्यातील माणिक मोती

स्वामीजींना मिळालेले पुरस्कार


फोटो गॅलेरी

समर्पण तथा ग्रंथ खरेदीसाठी

Bank Details

UNION BANK OF INDIA, PAUD ROAD BRANCH,
SAVINGS BANK AC
NAME OF ACCOUNT - "DIVYONMESH SATSANG"
ACCOUNT NO. - 498802010031140
IFSC CODE - UBIN0549886

संपर्क

शुभांगी पाटील(दिव्योन्मेष सत्संग) - 9960572045 (९९६०५७२०४५)
जयंती यारगोप - 9822212606 (९८२२२१२६०६)
स्वामी स्वरूप स्वानंद - 9637584464 (९६३७५८४४७४)

चिंतने व काव्य

साधनेचे पहिले सूत्र: अनुताप

साधक जीवनात काही गोष्टी अनिवार्य पणे घडणे आवश्यक असते. अशा मन-बुद्धी च्या अनिवार्य जाणिवा म्हणजे साधक जीवनातील सूत्र. हे सूत्रच साधकाला त्याच्या अत्युच्च आत्मप्राप्तीकडे विकसित करत असते. १) अनुताप :- आपल्या मधील अज्ञाना मुळे, अर्धवट ज्ञाना मुळे, माहिती मुळे आपल्या जीवनात व्यावहारिक, तथा पारमार्थिक चुका घडत असतात.

एकांती

मी जाऊन बसलो, हृदयाच्या एकांती ! तव सत्य सापडले, मज या अवनीवरती !! मी स्पर्शित होतो, भाव भावना येथे ! दुःख मूळ जे, ग्रासित होतो तेथे ! मी शोधित होतो सुख... या जीवन पुष्पावरती !! दुःख परागची ते, चिकटत होते मम पंखा वरती ! मी प्राशीत होतो, गन्ध-रस तो जेंव्हा ! नकळत तिरके काटे, बोचत होते तेंव्हा !! रक्ताच्या दुःखातुनी, एकांती जाऊन बसलो !

संपर्क

दिव्योन्मेष सत्संग

डॉ. सुधीर पांडे

प्लॉट न. ७ , लेन न. ७ , “सोहम “, राजपथ सोसायटी,

रामकृष्ण परमहंस नगर , पौड रोड ,

कोथरूड , पुणे : ४११०३८.

Contact No. : +91 9960572045
Email : divyonmesh@gmail.com