सत्संग

रोजचा सत्संग

सोमवार आणि गुरुवारी

संध्याकाळी 5.30 pm ते 7.00 pm

दिव्योन्मेष सत्संगातर्फे गेली सहा वर्ष स्वामी स्वरूप स्वानंद यांचा ज्ञानेश्वरी सत्संग सुरू आहे. ह्या सत्संगातून प्राकृतात असलेली व सर्वांना समजायला अवघड असलेली ज्ञानेश्वरी, अत्यंत सोपी करून ते सांगतात. त्याचबरोबर उदाहरणं देऊन हे तत्वज्ञान आपल्या जीवनात कसे उतरवायचे हे ही शिकवतात. त्यांच्या अत्यंत सोपे करून सांगण्याच्या पद्धतीमुळे या विषयाची गोडी निर्माण होते व ज्ञानेश्वरीसारख्या श्रेष्ठ ग्रंथाचे अवलोकन होते. तसेच जेव्हा उत्सव असतात तेव्हा त्या दिवसाचे महत्व व त्या विषयाची ओळख करून देत प्रबोधन केले जाते.

जसे १५ ऑगस्ट हा दिवस स्वामी स्वरूपानंद आणि रामकृष्ण परमहंस ह्यांचा समाधी दिन आहे, आपला स्वातंत्र्य दिन आहे आणि अतिमानस दिन पण आहे. ह्या दिवशी स्वामी स्वरूप स्वानंद यांनी योगी अरविंद यांचे तत्त्वज्ञान, स्वामी स्वरूपानंद ह्यांनी सांगितलेली सोहम साधना, स्वातंत्र्याची खरी संकल्पना ह्या सर्व विषयांची सांगड घालून केलेले प्रबोधन अतिशय महत्त्वपूर्ण होते. तसेच रामनवमी, हनुमानजयंती आणि ह्यासारख्या विशेष दिवशी केलेले विवेचनही खूप अभ्यासनीय आहे.