|| सोहम ||
(Meditation by Mind & Intellect Simulation Technique)
नमस्कार!! आपण मानव म्हणून खरंच चांर्ले असतो, संस्कारक्षम श्रद्धाळू असतो. रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला, आपल्या श्रद्धास्थानाची उपासना दैनंदिन जीवनात कशाप्रकारे आणावी ? हा प्रश्न पडतो. मनाची होणारी घालमेल, बुद्धीवर पडणारा ताण-तणाव व यांच्यातून निर्माण होणारी चित्ताची अस्वस्थता, माणसाचे अंतरंग हेच उपासनेमध्ये मोठा व्यत्यय आणत असते. त्यामुळे शांती, समाधान कुठेतरी दूर राहते, हरवून जाते. शारीरिक तंदुरुस्तीसाठी आपण प्राणायाम, योगासने यांचा वापर आपल्या जीवनात करतो; पण तरीसुद्धा शांती, समाधान दूर राहतेच! आपल्या बुद्धीच्या व वृत्तीच्या इशाऱ्याप्रमाणे आपले मन समाधान शोधत असते. हा शोध माणसाला अजूनच अस्वस्थ करतो.
वेद-उपनिषदांपासून चालत आलेल्या, सनातन असा ननरामय जीवन पद्धतीचा अभ्यास ऋषी-मुनींनी केला. बदलत्या काळाच्या स्वरूपाप्रमाणे त्यात बदल झाले. भगवद्गीता, ज्ञानेश्वरी या ग्रंथातून नवनवध जीवन पद्धतीचा उहापोह, प्रत्यक्ष भर्वंत व अजुगन यांच्या संवादातून झाला. तसेच दासबोध, भार्वत, तुकारामांची गाथा आदी ग्रंथ हे आधुननक काळातील मार्गदशगक ग्रंथ. या ग्रंथामधून भक्ती, ज्ञान व कमग यांच्यावर अनधनित अवधान प्रक्रिया व त्यांचे मार्गदर्शन केले आहे. हाच नेमका धागा पकडून, स्वरूप ध्यान प्रक्रियेतून सूक्ष्म तथा ब्रम्हांडाच्या जाणिवेत पोहचून समाधान प्राप्त करणे महत्त्वाचे नाही का ? आपल्या उपासना पद्धतीमधील अडथळे दूर करून, रोज आपल्या श्रद्धास्थानापासून समाधान प्राप्त व्हावे व निरामय जीवन पद्धती आत्मसात व्हावी; यासाठीच ही शरीर, मन, बुद्धी यांच्या जानिवेतून ध्यान प्रक्रिया... सात्विक जीवनातील राजयोग!!
|| सोहम ||
| अनुक्रमांक | Phase – I Conduction (वहन) |
Phase – II Convection ( (अदिसरण) |
Phase – III Radiation (उत्सर्जन) |
|---|---|---|---|
| 1 | सत्य-असत्य, ज्ञान-अज्ञान याची ओळख | जीवात्म्याची जाणीव (जन्म, जीवन, मृत्यू) व 'चैतन्याची' स्थिती, चौदा भुवने | आपल्यात ईश्वर केव्हा आला व त्याने काय केले? |
| 2 | प्रपंच व परमार्थ यातील साम्य व फरक, प्राप्त जीवनातून मुक्तीच्या वाटा | सूक्ष्मातून स्थूलाची निर्मिती, अव्यक्तातून व्यक्त होणारे विश्व (ब्रह्मांड), प्रकृती | मी 'तो' आहेः ओम् तत्वं सोऽहम् सहः सर्वं खलु इदम् ब्रह्म |
| 3 | पंचज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, मन, बुद्धी, अहंकार ओळख व कार्यपद्धती | ओंकाराचे स्वरूप, मूळमाया, गुणमाया, गुणांचे प्रकट्य | Aspiration, Rejection, Surrender मनन, चिंतन, निदिध्यास (आळस, निद्रा, चिंता-भ्रष्टत्रयी) |
| 4 | पंचप्राणः प्राण, अपान, व्यान, उदान, समान; पंचतन्मात्रा | आपल्यातील ईश्वरः 1) परा, पश्यन्ती, मध्यमा.... 2) शक्तिस्थानेः मूलाधार, स्वाधिष्ठान.... सहस्रदल | कर्म, ज्ञान व भक्ती यातून साधणारा योग |
| 5 | पंचकोषः अन्नमय, वासनामय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय | साधनेची त्रिसूत्रीः अनुताप, निश्चय आत्मशोधाची शक्ती | दिव्य समाधानाची, शांतीची, आनंदाची संकल्पना व स्पर्श!! |
| Expected Duration (अंदाजे कालावधी) | 7 hrs (7 तास) |
8 hrs (8 तास) |
10 hrs (10 तास) |
गुरुकृपांकित,
आत्मप्रवासी,
स्वामी स्वरूप स्वानंद
संपर्क क्रमांक: 9637584464
Website: www.divyonmesh.com
आपले योग्य प्रश्न व त्याचे समाधान, हा या सत्संगाचा हेतू आहेच !!
|| स्वरूप स्वानंद एकचि जाणे, गुरुतत्वासि नित्य स्मरावे ||