Years |
---|
२०२४ |
२०२३ |
२०२२ |
०२ सप्टेंबर २०२४ रोजी, ठाणे सत्संग परिवाराने आळंदी येथे श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची समाप्ती
प. पू. स्वामीजींच्या उपस्थितीत केली. त्यावेळी प. पू स्वामी स्वरूप स्वानंद व सर्व साधकांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाचा लाभ घेतला. तसेच सर्वं खल्विदंम् ब्रह्म या ईश्वरी भावातून सगळ्यांनी एकत्र येऊन आनंदाची अनुभूती घेतली. ईश्वरी द्वारात द्वैत-अद्वैताचा भाव फुगडी धरून आणि नाम घोषाने गाभाऱ्यात आनंद दुमदुमत होता .
प. पू स्वामीजींनी ८ वर्षे ज्ञानेश्वरी निरूपणातून भावार्थदीपिका १८ व्या अध्याया पर्यंत आध्यात्मिक तत्वज्ञान साधकांपर्यत पोहचते केले. तो आनंद इथे जाणवत होता. तसेच संप्रदायाच्या पलिकडे ईश्वरीतत्व,गुरूतत्वाकडे कसे बघायचे यावर माऊलींच्या आळंदीत निरूपण करून, त्यांचा माऊलींप्रती आत्मियभाव समर्पित केला. त्यावेळी ठाणे सत्संगातील ७० साधक, दिव्योन्मेष सत्संगातील २० साधक उपस्थित होते.
स्वामिजींचा सत्कार करण्यात आला. तसेच वारकरी संप्रदायाचे ह. भ. प. सानप महाराजांचा सत्कार स्वामिजींच्या हस्ते करण्यात आला. तसेच दिव्योन्मेष सत्संगाकडून आर्थिक समर्पण ही करण्यात आले.
स्वामीजींना धन्यवाद!!
वृत्तांकन:
सौ. शुभांगी पाटील
( दिव्योन्मेष सत्संग सदस्य, पुणे. )