‘आदिनाथ’ हे विश्वगुरू ते, शिवस्वरूपी निरंजनी वसते |
अनुग्रह देती शक्ती सहित ते, आत्म प्रकाशे ‘मत्स्येंद्रनाथे’ ||
अध्यात्माच्या स्वरूपा जाणुनी, साधनी स्वयंभु सिद्ध करोनी |
‘गोरक्षनाथे’ ‘सबदी ‘ लिहोनी, ‘सोहम’ तोचि आकारी ||
गुह्यज्ञान ते गुह्य साधन ते, अवतार स्वरूपी नाथ जाणीवे ||
‘गहिनी’ बोधे मानवा कारणे, ‘निवृत्तीनाथे’ गुहा दर्शने ||
त्याच साधनी ज्ञानेश्वराते, संजीवन देऊनि विश्व प्रसारे |
मंदियाळीसी आदेश घेऊनि, ‘देव’, ‘चुडामणी’ ते अग्री ठेविती ||
‘ज्ञान’ किर्तनी सोहम भावे, ‘गुंडाख्यांचे’ किर्तन चाले |
‘रामचंद्रही’ त्याच साधनी, ‘महादेव’तो पुनः प्रवेशी ||
‘तिन कोटा’ तुन ‘राम’ जाणुनी, नि:शून्यातून ‘विश्वनाथा’ घेऊनि |
‘गुरु गणेश’ तेही ज्ञानेश्वर होऊनि, ‘स्वरूपानंदा’ भूषवी ||
स्वरूपा मधुनी विश्व जाणुनी, विश्वा मधे ते स्वरूप बघोनी |
साधनेतून ‘स्व ‘ मावळोनी, निरंजनी असतो ||
ऐशा त्या सुलभ साधनी, सोहम चा तो प्रत्यय घेऊनि |
‘स्वरूप स्वानंदी’ रमतो, ‘आदेश गुरूदेवांचा’ जगतो ||
गुरुकृपांकित
स्वामी स्वरूप स्वानंद